राणी सईबाईंचा मृत्यू कसा झाला? व याचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर काय परिणाम झाला?
राणी सईबाईंचा मृत्यू कसा झाला? व याचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर काय परिणाम झाला? 🇮🇳 पुढील उत्तर हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत असून एक चिकित्सात्मक उत्तर आहे. ह्या उत्तरास संदर्भासहित स्पष्ट करण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे स-संदर्भ उत्तर वाचायचे असल्यास पुढील उत्तर वाचू नये ही नम्र विनंती आहे. 😊🙏 राणी सईबाईंचा मृत्यू कसा झाला ? -बाळंत रोग. याचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर काय परिणाम झाला? एखादी राजकीय व्यक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कशी होती ह्याबद्दल इतिहास फारसे कधी बोलत नाही. शिवाजी महाराज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे होते ह्याबद्दल कोणत्याच साधनात जास्त माहिती आढळून येत नाही. शिवराय एक आदर्श पती किंवा पिता होते का ? हा प्रश्न जर तुम्ही इतिहासपुरुषाला विचाराल तर तो सुद्धा मूग गिळून गप्प बसेल; कारण त्याच्याकडे सुद्धा ह्याचे उत्तर नाही. इतिहासाकडे ह्याचे उत्तर नसणे हेच योग्य आहे; कारण आदर्श पती/पिता होण्यासाठी शिवरायांचा जन्म झाला नव्हता, त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे होते. ज्याला अवघ्या जगाचा संसार सांभाळायचा असतो त्याला स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे...