बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती?
बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती? उत्तर द्या 3 फॉलो करत आहे विनंती करा आणखी 2 उत्तरे अवधूत मोहिते , दिसामाजी काहीतरी ते लिहावे| प्रसंगे अखंडित वाचीत जावे || 2021-1-16 अपडेट केले भाकडकथा आणि चमत्कार तर प्रत्येक धर्मातच भरपूर असतात. त्याप्रमाणे ते बौद्ध धर्मातही आहेत. बौद्ध साहित्यात अनेक देवता, असुर, गंधर्व, यक्ष अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. असुरलोक, भूतलोक, ब्रह्मलोक अशा जागांचा उल्लेख आहे. एकूण ३१ प्रकारचे स्वर्ग आणि नरक आहेत असे मानले जाते. भगवान बुद्ध वृक्षाखाली समाधी लावून बसले असताना 'मारा' नावाच्या राक्षसाने त्यांना जादूई प्रलोभने दाखवली अशी कथा तिबेट आणि चीनमध्ये प्रसिद्ध आहे. कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत बौद्ध धर्माने मान्य केला आहे, तो सिद्धांत बऱ्याच जणांना अंधश्रद्धा वाटतो. दलाई लामा म्हणजे अवलोकितेश्र्वर या देवतेचा अवतार आहेत असे बौद्ध धर्मात मानले जाते. बौद्ध धर्मात बोधिसत्व नावाचा जो प्रकार आहे तो म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातील अवतारवादाची नक्कल केली आहे. बोधिसत्व म्हणजे असा आत्मा जो लोकांच्या कल्याणासाठी अनेकवेळ...