प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली?

उत्तर द्या
2
फॉलो करा
विनंती करा
आणखी

प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली?

प्रवीण तरडेंकडून सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे त्यांनी संविधान घरात ठेवले. कारणे बघा…

त्यात संविधानाचा अपमान झाला का ?

जर आरास करण्याचा हेतू चुकीचा असता तर संविधानाचा नक्कीच अपमान झाला असता. त्यांची संकल्पना होती की पुस्तक बाप्पा पुस्तक. ही काही नवीन नाही मात्र इतर सर्व पुस्तकांत बाप्पाला सर्वात जवळचे म्हणजे संविधान. संविधानावरील श्रद्धा आमची बाप्पा सारखी आहे (नक्कीच बाप्पा वरील श्रध्दा चांगली त्याचप्रमाणे संविधानाची.) हे त्यांना दर्शवयाचे होते. एव्हाना आम्ही आज बाप्पा पूजतोय तो संविधानाच्या महत्तेमुळेच हे बोध दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र झालं ते उलटंच अन अजून अंगावर आले. पण ज्या हेतूने त्यांनी caption दिले होते तो नक्कीच वाईट नव्हता ( आज आमच्या घरी पुस्तक बाप्पा पुस्तक… यात कुठेही संविधान विरोधी विधान नव्हते.) त्यामुळे संविधानाचा अपमान झाला असे एक वर्ग सोडून इतर कोणालाही जाणवले नाही- कारण भावना शुद्ध होती.

संविधानाचा अपमान झाला असे का वाटले ?

घटित प्रकरणात फक्त एका विशिष्ट समाजवर्गाला गणपती ठेवल्याने अपमान झाला असे वाटत आहे. मात्र इतर समाजाच्या दृष्टिकोनातून ही सर्वसामान्य बाब आहे. मग यात चुकीचे कोण विरोध करणारा की न करणारा ? मुख्यतः मला यात चूक दोन्ही वर्गांची वाटत नाही. कारण

  1. पहिला वर्ग असा आहे, ज्याला सर्व हक्क संविधानाने दिले आहेत, जे २५०० वर्षांपासून वंचित होते. अश्या वर्गाला जर एक ग्रंथ नवजीवन देऊ शकते तर तो ग्रंथ नक्कीच हा त्यांच्यासाठी सामान्य नसेल. शिवाय बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञेनुसार व त्यांची पार्श्वभूमीनुसार देवतांवरील श्रद्धा त्यांना नाही, त्यामुळे त्यांचा जीवनदाता संविधान ग्रंथावर देवता ठेवल्याने तो अपमान झाला असे त्यांना वाटत आहे.
  2. दुसरा वर्ग म्हणजे ज्यांना आधीपासून सर्व हक्क होते मात्र समानता ज्या ग्रंथाने निर्माण केली तो ग्रंथ हिंदूं-मुस्लिमसाठी तितकाच मोलाचा आहे. शिवाय दुसऱ्या वर्गाला गणपती हा किती प्राणप्रिय व लाडका आहे हे सर्वज्ञात आहे. अश्या लाडक्या, प्रेमळ, श्रद्धास्थान जवळ दुसरे श्रद्धास्थान ठेवणे म्हणजे द्विगुणित श्रद्धा निर्माण होणे हाच भाव दुसऱ्या सामाजाच्या मनात आहे. त्यामुळे संविधानाच्या वर गणेश ठेवणे म्हणजे संविधानावर श्रद्धा ठेवणे हीच भावना दुसऱ्या वर्गाच्या मनात आहे. म्हणूंन दुसऱ्या वर्गाला यामुळे संविधानाचा अपमान झाला, असे काहीही वाटत नाही.

कायदेशीर बाजूने हे प्रकरण ?

भारतीय दंड संहिता की धारा 124 A के अनुसार, जो भी लिखित या फिर मौखिक शब्‍दों, या फिर चिन्‍हों या फिर प्रत्‍यक्ष या अप्रत्‍यक्ष तौर पर नफरत फैलाने या फिर असंतोष जाहिर करने पर देशद्रोह का मामला दर्ज किया जाता है।

इसके तहत दोषी को 3 साल से लेकर उम्रकैद तक की सजा हो सकती है साथ ही जुर्माना भी लगाया जा सकता है।[1]

याप्रमाणे प्रवीण तरडेंनी राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केलेला नाही शिवाय त्यांनी पोस्ट् टाकताना संविधानाचा अपमान होईल असे कोणतेही विधान, कृत्य केलेले नाही. एव्हाना पुस्तक विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे. IPC 124 (A) चा खटला हा सरळ उच्च व सर्वोच्च न्यायालयात चालतो. त्यामुळे जर न्यायालयाला कायदेभंग आढळेल तर नक्कीच त्यांनी प्रवीण तरडेंवर कारवाई चालवावी.

प्रवीण तरडेंनी माफी मागीतली तरी प्रकरण का वाढलं ?

तरडेरावांनी माफी मागताना “मी एका ***समाजाच्या लोकांची भावना दुखावल्या ने माफी मागतोय” असे वक्तव्य केले त्यामुळे हे प्रकरण अधिक चिळघळले आहे. खरं तर एका बाजूने पाहिल्यास या वक्तव्यात काहीही चूक नाही. कारण एक विशिष्ट वर्ग सोडून दुसऱ्या कोणताही समाजाला काही जाणवले नाही. त्यामुळे ज्या वर्गाच्या भावना दुखल्या फक्त त्याच वर्गाची माफी मागितली एवढेच मग सर्व भारतीय फक्त एका विरोधकर्त्या वर्गामध्ये कसे येतील. जर सर्व भारतीय व भारतातील समाजाने प्रवीण तरडेंना विरोध केला असता तर त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागणे बंधनकारक होते. त्रास फक्त एकाच वर्गाला असल्याने त्यांनी फक्त एकाच वर्गाच्या भावनांबद्दल माफी मागितली त्यात गैर काहीही नाही.

मात्र संबंधित वर्गाची अशी समजूत दाखवण्याचा प्रयत्न आहे की, त्यांना दुःख झाले म्हणजे सर्व भारतीयांना दुःख झाले. यामुळे गल्ली बोळातील छोट्या मोठ्या संस्थांचे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा माफीवर प्रकरण न थांबवता मोठमोठ्या धमक्या देत आहेत. …


संविधान हे इतके पवित्र आहे की, जगातील कोणत्याही गोष्टीने त्याचे पावित्र्य भंग होणर नाही अथवा अपमानित होणार नाही. शिवाय संविधान हा एका विशिष्ट वर्गाचा धर्मग्रंथ नाही त्यामुळे याप्रकरणी त्यांनी कायदा हातात घेऊन संविधान वाचवण्याचे सोंग करत त्याच संविधानाला पायमल्ली आणू नये. खरं तर संविधानाचा खोटा पुळका बाळगत गणेशोत्सव व हिंदू सणांचा तिटकारामुळे प्रवीण तरडेंनी माफी मागून सुद्धा मंडळी वाद सोडायला तयार नाहीत.

प्रविण तरडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही? शूटिंग करू देणार नाही ? अश्या बऱ्याच धमक्या गल्ली-बोळातील संविधान बचाओ संघटना देत आहेत. मात्र ते इतका ही विचार करीत नाही की, संविधानाने सर्वांना मूलभूत हक्कात संचार व मनोरंजन करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. कायदा हातात का घेतात ? सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का ? जर नसेल तर संविधानावर सुध्दा विश्वास नाही. कारण सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या संरक्षणाचे प्रतिनिधित्व करते.

भारताला राष्ट्रीय ग्रंथ नाही. राष्ट्रीय चिन्हात वाघ, अशोक चक्र, वाघ, मोर, तिरंगा असला तरी भारतीय संविधान राष्ट्रीय चिन्हात येत नाही. अन संविधान जोपासण्याच्या इतक्याच अटी-तटी असतील तर सामान्य जनता संविधानाला हात लावायला ही घाबरेल. त्याला इथेच ठेवा असे ठेवू नका, असेच वाचा असे वाचू नका इतक्या अटी लादल्यावर अन हे प्रकरण पाहून संविधान घरात ठेवणे किती जोखमीचे आहे, असे वाटू लागलंय. अन याने खरंच संविधान घरोघरी पोहचेल का ? हा विचार करावा

संविधानावर वाढती मक्तेदारी इतर समाजाला संविधानापासून अधिक दूर लोटत आहे. संविधान सर्वांचे आहे, सर्वांना संविधान संरक्षणाची काळजी आहे. पण त्याच्या बचावासाठी स्वतः कट्टरवाद ओढवणे व मूलभूत हक्कांवर जबरीने बंधन घालणे हे संविधानाच्याच नियमांचे उल्लंघन आहे.

जय हिंद

चैतन्य

तळटीपा

230
38
टिप्पणी समाविष्ट करा…

यांनी केलेला विरोध आणि इतर माध्यमांवर केलेल्या टिप्पण्या बघून असे वाटत आहे की हे लोक संविधानाला संविधान न मानता त्यांच्या धर्माचा धर्मग्रंथ मनात आहे. आणि अशा गोष्टींवरून मोठा गदारोळ करण्याची सवय यांना आधीपासूनच आहे.

35
प्रत्युत्तर द्या

येथे बऱ्याच लोकांनी चांगली उत्तरे लिहीली आहेत. थोडक्यात संविधान आमच्याही तितक्याच हक्काचं आहे जितका हक्क एक विशिष्ट वर्ग दाखवत आहे. मग ज्यावेळेस दिल्लीत संविधान प्रती जाळण्यात आल्या तेव्हा बाकीचे हक्क दाखवणारे कुठे गेले होते. किती लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. किती लोकांनी आंदोलने केली. कारण माझ्या माहितीत नाही म्हणून विचारले. जर कुणाला याबाबत माहिती असेल तर सांगावी.

20
प्रत्युत्तर द्या

त्यांच्या पूढे यांची शेपूट…….जाते.

2
प्रत्युत्तर द्या

मग एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही पण निषेध व्यक्त करू शकला असता ना……पण तुम्ही ते केला नाही…..का नाही केला…?? तुम्ही ही शेपुट घालून घेतली होती का…??

7
प्रत्युत्तर द्या

अर्धसत्य…

त्या वेळी समाजातील सर्व स्तरातील सर्वानी विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला होता..

अगदी मंत्रालयातील माझ्या ऑफिस ग्रुपवर सुद्धा सर्व जण या करीता ॲक्टीव्ह होते..

माझ्या काही मित्रानी वेगवेगळ्या वर्तमान पत्रांमधील "वाचक पत्रे" सदरांमधे पत्रे ही लिहीलेली आहेत..

फक्त गप्प राहिले होते ते , "कुंपणा वरील" नेते..

कारण त्याना "शांतिप्रिय" समाजाला दुखवायचे नव्हते.

आपणास नम्र विनंती आहे की ,

कृपया गैरसमजाला आणि अपप्रचाराला बळी पडू नका., "अति शांतिप्रिय" मंडळी वगळता आम्ही सर्वाना आपले मानतो..

एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा , या "अति शांतिप्रिय" मंडळींच्या नजरेत "बाकीचे सारे एकच" आहेत., अशावेळी बाकीच्यानी आपापले सवते सुभे उभारणे धोकादायकच नव्हे तर कदाचित "आत्म घातकी" पणाचे ठरेल.

5
प्रत्युत्तर द्या

अगदी बरोबर बोललात सरं, ही अक्कल यांना येत नाही, संविधानावर यांना मालकी हक्क पाहिजे. मुस्लिम यांना वापरून घेतात व काम झाल्यावर यांनाच पहिलं बाटवतील. यांना फक्त जून्या गोष्टी उकरायची सवय आहे. आम्ही आता जातीपाती मानणच सोडून दिले आणि यांना ही हक्काची वाटते का तर आरक्षण. यांचा देव सुध्दा आमच्याच विष्णू चा अवतार आहे मागील 2,500 वर्षांपासून. आणि हे म्हणतात आम्ही हिंदु नाही? मुसलमान आता इंग्रजांसारखे फोडा- झोडा आणि राज्य करा, ही कल्पना वापरतात, आणि हा समाज त्यांना बळी पडतो.

विष्णू यांना सुद्बुध्दी देवो, हीच प्रार्थना.

4
प्रत्युत्तर द्या

चैतन्य जी अत्यंत संतुलित शब्दात सत्य मांडलेय.

4
प्रत्युत्तर द्या

छान लिहलय चैतन्य. संविधानाला राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रीय पुस्तक दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे कोठे लिहिलं आहे , हे ते लोक भडकवणाऱ्या पैकी कोणालाच विचारत नाही.

माझ्या घरी जर संविधान असेल आणि मी ते इतर पुस्तकांच्या खाली ठेवले तरी तो अपमानच होईल, नाही का? 😊😊

12
प्रत्युत्तर द्या
·

चैतन्य जी अत्यंत संतुलित शब्दात सत्य मांडलेय.

4
प्रत्युत्तर द्या

छान लिहलय चैतन्य. संविधानाला राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रीय पुस्तक दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे कोठे लिहिलं आहे , हे ते लोक भडकवणाऱ्या पैकी कोणालाच विचारत नाही.

माझ्या घरी जर संविधान असेल आणि मी ते इतर पुस्तकांच्या खाली ठेवले तरी तो अपमानच होईल, नाही का? 😊😊

12
प्रत्युत्तर द्या

टीका करणाऱ्या पैकी एकाने तरी कधी संविधानाचे १ पान तरी वाचलं असेल का या बाबत शंका वाटते.

4
प्रत्युत्तर द्या

प्रवीण तरडे यांनी जर संविधान गणपती बाप्पा च्या खाली ठेऊन संविधानाचा अपमान केला आहे तर जे लोक प्रवीण तरडे यांना फोन करून शिव्या देत आहेत किंवा धमक्या देत आहेत ते सुद्धा संविधानाचा अपमान करत आहेत असे नाही वाटत का.

5
प्रत्युत्तर द्या

देशाच्या संविधानाला प्रायव्हेट प्रापर्टी करून त्याच्या मूल्याची ऐशीतैसी करण्यासाठी चढाओढ करण्यात या मुर्खांचा हात कोणी धरू शकत नाही. बाबासाहेबांच्या नावाने जो गोंधळ घातला आहे ते पाहून वाटते कि बाबासाहेब असते तर यांना चाबकाचे फटके दिले असते.

24
प्रत्युत्तर द्या

दुर्दैवी प्रकार आहे…

हातावर पोट असणारे , शेतात घाम गाळणारे , असे कितीतरी नागरिक असण्याची शक्यता आहे , ज्याना संविधान म्हणजे काय हेच मुळात माहिती नसेल…

बरं …

संविधान बाबासाहेबानी लिहिल , देशाने त्याला मान्यता/संमती दिली मग ते संपूर्ण देशाचं झालय , म्हणून ते बाबासाहेबांच्या हातात दाखवण्याला कोणी विरोध केला तर त्याचाही विचार करावाच लागेल…

6
प्रत्युत्तर द्या

दीपक तुम्हाला संविधान हातात असणे आणि पायाखाली असणे यातील फरक कळतो का?

4
प्रत्युत्तर द्या

शरीराचा पाय हा भाग हीन आहे का ? मनुष्यासाठी पाय हीन भाग असावा पण देवता व महापुरुषांना शरीराचे सर्व अंग समान दर्जाचे असतात.

आपण कोणत्याही महापुरुषांना पदवंदन करतो, त्यांच्या डोक्याला वंदन करीत नाही. शिवाय गणपतीची मूर्ती संविधानाला पाय लावते आहे, असे चित्रात तरी कुठे आहे ? शिवाय संविधानावर गणपती बनवणे चुकीचं का आहे ? गणपतीने कोणते भेदभाव केले, अत्याचार केले, जातीवाद केला, मग गणपती ठेवल्याने अपमान कसा होईल.

9
प्रत्युत्तर द्या

चैतन्य हाच तर्क देऊन उद्या इतर धर्माचे लोक ही आपल्या आपल्या दैवतांच्या आणि महापुरुषांच्या पायाखाली संविधान ठेवतील.

संविधान हे सर्व धर्माना मान्यता देत. परंतु संविधान हे स्वतः सर्व धर्मांच्या पल्याड आहे. त्यामुळे आपापले धार्मिक मान्यता, तर्क संविधानाला लावणे चुकीचे आहे. तसेच आपल्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करून संविधानाचा अपमान करणे हेही चुकच !

तरडेंनी जर रामायण, महाभारत, वेद, उपनिषद पाटाखाली ठेवले असते तर चालले असते का?

ते तरी धार्मिक ग्रंथ आहेत परंतु संविधान तर या सर्वापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ते या देशातील सर्व धर्म, लोक या सर्वांनाच लागू होते.

तुम्ही म्हणता तरडेंनी घरात संविधान ठेवले हीच चूक केली किंवा संविधान एकाच वर्गाची मक्तेदारी झालीय. त्यामुळे इतर समाज दूर जातोय.

पण आंबेडकरी समाजालाच असे का वाटते इतरांना का वाटत नाही?

जेव्हा दिल्लीत संविधान जाळले गेले तेव्हा आपण निषेध व्यक्त केला होता का?

संविधान जाळल्यानंतरही आंबेडकरी जनतेनेच निषेध, मोर्चे वगैरे गोष्टी केल्या,

इतर समाज गप्पच होता. अतिशय निवडक लोकांनीच याचा निषेध केला.

त्यामुळे आंबेडकरी समाज जागल्यासारखी भूमिका घेऊन संविधानविरोधी प्रत्येक डाव हणून पाडण्याचा प्रयत्न करतो.

आज संविधान आहे म्हणून 70 वर्षे देश अबाधितपणे आपलं सार्वभोंवमत्व, नागरी अधिकार, राजकीय अधिकार, लोकशाही टिकवून आहे.

त्यामुळे संविधानाचा योग्य तो आदर राखला गेलाच पाहिजे

4
प्रत्युत्तर द्या

संविधान जाळल्याचा व फडल्याचा मी प्रत्यक्ष विरोध केला होता व बुद्धिजीवी असल्याने लांबलचक लेख लिहून विरोध सुद्धा केला होता.

तरडेंनी संविधानाऐवजी गीता, वेद, उपनिषदे व सर्व शास्त्र ठेवली असती तर नक्कीच यातून सर्वोच्च संदेश गेला असता. गीता गणपतीच्या खाली ठेवा की वर ठेवा याने काहीही फरक पडणार नाही. कारण गीता खरी स्वतंत्रवादी आहे, त्यावर कोणीही लिहू शकते बोलु शकतो. तुम्ही बाबासाहेबांच्या चरणात बिनधास्तपणे भगवत गीता जरी ठेवली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण आमचा भाव व श्रद्धा हे दोघे सकारात्मक व शुद्ध असतात.

संविधान धर्माच्य पलीकडे नाही, संविधान सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आचरणाचे स्वतंत्र देते. संविधान धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे स्वतःला स्वघोषित संविधान संरक्षक समजू नका. संविधाच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी संविधानातच विशेष तरतुदी दिल्या आहेत. शिवाय संविधान संरक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे संविधान तुमच्यामुळेच टिकले आहे इतका स्वतःवर आव आणू नका.

तुमची गणपती वर श्रद्धा नसल्याने तुम्हाला संविधानाचा अपमान वाटू शकतो पण आम्हाला यात काहीही गैर वाटत नाही कारण गणपती व संविधान हे दोघे आम्हाला श्रद्धास्थानी आहेत. संविधानाचा अपमान झाल्यावर सर्वोच्च न्यायालय आहेच, ते जे निर्णय घेईल तो सर्वोमान्य असेल. अन तुम्हालाही मान्य करावे लागेल.

14
प्रत्युत्तर द्या

संविधान जर पाया खाली दाखवले असते तर , म्हणजेच त्यावर मूर्ति उभी दाखवली असती तर मी सुद्धा त्याला कडाडून विरोधच केला असता , हे सुद्धा कृपया लक्षात घ्या की संविधानाचे पावित्र्य अबाधित आहे , फक्त कोण आणि त्याला कोणत्या ॲंगलने बघतात हे विचारात घेणे गरजेचे आहे , येथे तरडे यांनी त्यांचे दैवत , बुद्धिदेवता मानण्यात येणा-या श्री गणेशा सोबत संविधानाला किंवा आपण असेही म्हणू शकतो की संविधानासोबत गणेशाला स्थान दिले आहे , तरडे यांचा हेतू स्वच्छ नव्हता असे मला तरी वाटत नाही.

श्री. तरडे यानी संविधानाच्या जागी कुराण , बायबल , गीता , रामायण/महाभारत दाखवले असते तरी मला ते आक्षेपार्ह वाटले नसते.

या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे असे समजते , त्यामुळे जर तरडे दोषी ठरले तर त्यांना योग्य ती शिक्षा भोगावीच लागेल…!

3
प्रत्युत्तर द्या

मला तुमच्या सारख्या विचारांच्या माणसांना सांगायचं आहे की, जर ते संविधान लिहिलेच नसते तर देशाने काय accept केले असते. त्यांनी लिहिलेल्या संविधानाने आज संपूर्ण देश चालतो. ठीक आहे. त्याला विरोध करून परत मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करणारे च संविधानाला विरोध करू शकतात

5
प्रत्युत्तर द्या

इतिहासात जर तर ची भाषा नसते. देश निर्मिती झाला म्हणजे संविधान हे देश चालवण्यासाठी गरजेचेच आहे. संविधान बाबासाहेबांनी लिहिले नसते तर अन्य कोणीतरी लिहिलेच असते. भारतात अनेक विद्वान होते विशेष एवढेच की त्या सर्वात बाबासाहेब सर्वश्रेष्ठ होते त्यामुळे बाबासाहेबांना संविधान लिहिण्यास मसुदा समिती देण्यात आली.

अन भारतात मनुस्मृती संविधान लागू होती असे कोणत्याही बखरीत, इतिहास साधनांमध्ये उल्लेखित नाही. स्वार्थी ब्राह्मणांनी केलेला अत्याचार जसा तुम्हाला आठवतो तसा समाजाला उत्थानासाठी झटणारे आगरकर, राजाराम मोहन रॉय पण तुम्हाला आठवायला हवेत. शिवाय मनुस्मृती लागू असती तरी गायकवाडांनि बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली असती का ?

मनुस्मृती मध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत मग ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण असून सुद्धा त्यांना जाच सहन करावा लागला, का ? त्यावेळी मनुस्मृती नव्हती का ? ब्राह्मणांवर ब्रह्मणांनी अत्याचार केले हे मनुस्मृती नुसार नाही तर स्वार्थी मनोवृत्तीमुळे झाले आहे. मनुस्मृती लागू असती तर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारले नसते.

आणि हो गणपती जितका प्रिय आहे तितकाच एव्हाना त्यापेक्षा जास्त संविधान आम्हाला सुद्धा प्रिय आहे. स्वतःला स्वघोषित संविधानवादी दर्शवून तुम्ही असे समजता जसे तुम्हाला सोडून बाकी कोणालाही संविधान माहीत नाही…

वाचलं तरी आहे का ? की फक्त झेंडे नाचवता ?

😅😅😅😅

16
प्रत्युत्तर द्या

मनुस्मृति दहन दीन। ज्या दिवशी जातींचा हिंदूंचा मजकूर, दलितांचे आणि मिलेचे लोकांवर वर्चस्व, क्रोधाचा आणि क्रौर्याचा साक्षात्कारडॉ. आंबेडकर आणि हजारो स्वयंसेवक निषेध आणि आंदोलन करण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर खास बांधलेल्या प्रतिकात्मक अंत्यदर्शनासाठी सार्वजनिकरित्या जाळण्यात आले.

जर मनुस्मृती नसती तर बाबासाहेबांची ती का जाळली असती

1
प्रत्युत्तर द्या

१०१ टक्के सहमत आहे..👌👌

1
प्रत्युत्तर द्या

आदरणीय बाबासाहेबानी काश्मिर बाबतच्या ३५अ कलमाला विरोध केल्यावर तत्कालीन पंतप्रधानानी पर्याय शोधलाच की…, तसचं काहीस झाल असतं ; मनुस्मृती परत आणण्याचा कोणी प्रयत्न करीत असतील ते दाखवून द्या , आम्ही सारे त्याला विरोध करायला तुमच्या सोबत उभे राहु.

3
प्रत्युत्तर द्या

Are nay baba kon manusmruti aant..kahihi jhal ki hach dialogue 😆 आणि काय ओह साहेब.. खरंच संविधान वाचलं का आपण ? धर्म आणि राज्य या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असाव्यात अस आहे मात्र कुणाचा काय दर्जा हे दिल आहे का ?

2
प्रत्युत्तर द्या

darja ch bolaych zal tr to sarvana saman darja denyasathich sanvidhan aahe.

1
प्रत्युत्तर द्या

तुम्ही थोडक्यात पण बरोबर मुद्देसुद टिप्पणी केली आहे., हल्ली जरा काही खुट्ट झालं की ,

" हे खतरेमें आणि ते खतरेमें" अशी बोंब मारुन मोर्चे काढायचा धंदा जोरात सुरु आहे..

एक जर बारकाईने पाहिलं तर , काही ठराविक नेतेच ह्या उचापती करीत आहेत., ज्यांना "जनाधार" राहिलेला नाही असे नेते विशिष्ट "धर्माधार" घेऊन , आपणच यांचे तारणहार आहोत असा आव आणून वातावरण तापवायच्या प्रयत्नात असतात.

2
प्रत्युत्तर द्या

इथे एकच प्रश्न त्या विशिष्ट समाजाला विचारायचाय की आदरणीय बाबासाहेबांच्या विचारांनी, त्यांच्या चळवळीने प्रेरित झालेली ही मंडळी. मग ह्या समान सूत्राच्या चळवळीची अशी शंभर शकले का झाली? आज तुमचा प्रत्येक नेता बाबासाहेबांचा आदर्श सांगतो, पण सगळे वेगवेगळ्या दिशेला तोंड करून उभे आहेत. एक सत्तेत आहे, एक विरोधात आहे, एक आणखी तिसरीकडेच आहे. कारण तुम्हाला बाबासाहेब उमगलेच नाहीत.फक्त त्यांच्या नावाने राजकारण केलंत. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तरडेंना अपमानच करायचा असता तर गणेशाच्या जवळ संविधान ठेवलेच असते का??? संविधान हे समग्र भारतासाठी पवित्र आणि महनीय आहे, त्यावर कृपया आपला copyright सांगू नका. भाऊ कदमांना धमकी देणाऱ्या अशा लोकांना आज बाबासाहेब असते तर काय म्हणाले असते कोण जाणे. ज्या बाबासाहेबांनी नेहमी मुक्त विचार, जातीविरहित समाजाचा पुरस्कार केला, त्यात एखाद्याला त्याच समाजातील लोक धमक्या देत होते, हे बाबासाहेबांना रुचले असते का??

1
प्रत्युत्तर द्या

प्रवीण तरडेंनी "कुणाची" माफी मागितली याबद्दल देखील तुम्ही लिहायला हवं. एखादा विशिष्ट समाज संविधानावर स्वतःचा मालकी हक्क सांगत असेल तर हि निश्चितच धोक्याची घंटा आहे.

भाऊ कदम झाले, मग प्रवीण तरडे.. आता पुढे कुणाचा नंबर लागतोय ते बघायचंय. 🤐

12
प्रत्युत्तर द्या
·

खूप छान उत्तर त्याबद्दल अभिनंदन.

चैतन्य दादा तू जय हिंद लिहतोस तसेच खाली जय महाराष्ट्र पण लिहीत जा. कारण या महाराष्ट्राला स्वतः चा इतिहास आणि भूगोल दोन्ही आहेत.

जय हिंद

जय महाराष्ट्र

10
प्रत्युत्तर द्या

जय महाराष्ट्र जय गोडी गुजरात… या प्रकारच्या प्रांतीय घोषणा मला आवडत नाहीत अन कधीही मी त्यांचा वापर करीत नाही…

4
प्रत्युत्तर द्या

ज्या राज्यात आपण राहतो त्या भूमी बद्दल अभिमान बाळगायला पाहिजे पण असो 🙏🏻

2
प्रत्युत्तर द्या

मी देशात राहतो… मला देशाच्या भूमी बद्दल अभिमान आहेच…

2
प्रत्युत्तर द्या

त्याबद्दल अभिनंदनच 🙏🏻.

1
प्रत्युत्तर द्या

चुक झाली,माफी मागितली, वाद सम्पायला पाहिजे, पन राजकारण करुण जन भावना भडकावयाला विषय मिळाला. कुणितरी महाभाग आंदोलन करुण स्वताचे नाव नेता म्हणून पुढे करील. काही वाचक पन उत्तर देतांना जात बघुन टिप्पणी करतात असे वाटते.

4
प्रत्युत्तर द्या

अतिशय योग्य लिहिलयस मित्रा

2
प्रत्युत्तर द्या

माणसासाठी संविधान आहे संविधान साठी माणूस नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे.

7
प्रत्युत्तर द्या

एकदम सुंदर असे विवेचन केले आहे. एकूण एका वर्गाचे समाधान होईल असे. काही वर्गाला देव म्हणजे कोणी भयानक असे वाटते. तरी त्यांच्या वर्गात काहींची नावे भगवान..आशिष..रत्नाकर..आधी आहेत.

असो. परत एकदा लेखकाचे धन्यवाद.

1
प्रत्युत्तर द्या

He bagha aaplyakade he gallibolatale rastriya adhyaksha aahet tyani kadhi sanvidhan vachale nahi. Tasech he galli dada sagale pakdun thokale pahijet.

1
प्रत्युत्तर द्या

Perfect answer

2
प्रत्युत्तर द्या

अगदी संतुलित विश्लेषण! तरडेंवर झालेली टिका ही एकतर आरक्षणाला धक्का लागू नये, व नसलेले राजकीय अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार असावा..

1
प्रत्युत्तर द्या

विरोध कारण्याऱयांनी कधी संविधान वाचले का..? आणि जेव्हा संसदेत घटनेच्या प्रति ओवेसी फाडतो तेव्हा कुठं असतात हे.. की मिम भीम च्या नावाखाली लोकांना चुत्या बनवता ?

5
प्रत्युत्तर द्या

सुधारणा :

राज्यसभेत ओवेसींनी संविधान फाडले नसून विधायक मीर मोहम्मद फैयाज यांनी फाडले होते.

2
प्रत्युत्तर द्या

आपण अगदी तळमळीने , नाण्याच्या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकलाय , त्याबद्दल आपले अभिनंदन करण्यावरच थांबतोय..

कारण तुमचे उत्तर आणि त्यावरील टिप्पण्या यावर काय उलटसुलट प्रतिक्रीया येतील याची कल्पना आहे..

असो..

जाताजाता एक गोष्ट आठवली :

काही दिवसापूर्वी (काही वर्षापुर्वी असेल कदाचित) अमेरिके मधील काही खेळाडू , फुटबॉल खेळतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता., त्या फुटबॉलवर चक्क अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचा फोटो होता आणि त्याबद्दल अमेरिकेत कोणतीही चर्चा झाली नाही पण चर्चा रंगली , पाने भरून लिखाण झाले ते मात्र भारतात…!

🙏मेरा भारत महान…!

9
प्रत्युत्तर द्या

*** samajachi saddhya chi pidhi atyant vishari vichardhareni bharleli aahe….tyanchi top leadership islamic leaders chi daadhi kurwalnyat busy aahe…..aani hyana project naastik mhnun kele jaate pan hyancha sagla rokh fakt aani fakt hindu dharmavar ch asto….Bhau kadam che samju shkto jevha tyanche prakaran zale hote tevha nuktich kuthe tyana changli publicity paisa bhetayla laagle hote….aani tee eka mothya show che actor hote…..mhnun tevha tyani maafi magitli nahi tar show chi pan badnaami hou shakli asti…..varun bhau kadam tyach samajache……pan pravin tarde ek faar mothe,vicharvant aani swatantr vyaktimatva aahe…….tyani hya pora toranchya dhamki laa bhik ghalun maafi magaylach navhti pahije…..kaydeshir salla gheun tyani kay tee krayla pahije hote…..Pravin tarde kaarwai laa ghabarle pan hee dhamki denar fakt fb,whatsapp ithech dhamkya deu shktat court madhe pohochu shakat nahi…..tyamule apan kharach offence kela aahe kaa hee padtalun pahayla hawe hote tarde yaani…..aata tarde yaani maafi cha video post jee kahi asel tee delete krawe ,kaydeshir madat ghyawi aani adarsh nirman karu dyawa kii haa desh ithle sanvidhaan aani Dr.Babasaheb Ambedkar hee saglyanche aahe konachi maktedaari nahi…..aani jar aaj pravin tarde hyala bali padle tar udya dusra koni asel…..hee taalibani wagne navhe kaa???kahi kattar muslim ekhadya muslim celebrity nee hindu sananchya shubheccha dilyavar kashe tyavar tutun padtat tashech hee lok hindunvar tutun padat aahe…..hyana swatachya vyaktiswatantryachi kaalji aahe pan dusryachi aahe…….

2
प्रत्युत्तर द्या

    Comments