हिडन वॉरियर
Nayan Patil हो का भाऊ मग सरकार काय आहे... मोदीजी का सन्मानिय आहेत हे पण पाहावे... प्रत्येकांना हिडन वॉरियर असतो... साधा प्रपंच यशस्वी झाला तरी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते असे म्हणतो ना आपण...
मोदीजी सुशासन एकटयाने स्थापतील का? ते सर्वसमावेशक आहेत... पंतप्रधान असून कल्पवृक्ष आहेत.
त्यांची स्तुती करत नाहीय... परंतु वस्तूस्थिती ही नाकारता येत नाहीय ना?
हिंदूराष्ट्रात कोण हवं कोण नको याचा अजेंडा केलेला आहे काय? तसे असेल तर दलित द्वेष का? आणि दलित व्देष रहित, दलितविरहित हिंदू राष्ट्र हवे असेल. तर दलितांचं काय करायचे आपण निर्णय घेतलेले आहेत तेही सांगा.
नयनभाऊ पाटील यांनी सविस्तर, अभ्यासपूर्ण, सखोल माहितीसाठी खुप कष्ट घेतल्याचे दिसतेय. त्यावरून तरी
मी तर मानायला तयार आहे... संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीले नाही.. सांगा नयन भाऊ आमच्या मुखी कुणाचे नाव घ्यायला तुम्हाला आवडेल?
तुम्ही किंवा तुम्ही ज्या विचारधारेचे नेतृत्व करतात त्यांना अपेक्षित असणाऱ्यांचं नाव घेतो... मात्र वादंग नको.
या संविधानाने 75 % बहुजनांचे कल्याण झाले सोन्याचे दिवस आले. दैन्य गेले.. त्या बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी सांगा आम्ही संविधान निर्माता म्हणून कोणाचे नाव घ्यावे?
पंडित नेहरूजी, वल्लभभाई पटेलजी, डॉ.के.एम. मुंशीजी की आणखी कोण?
मुळात प्रश्न हिंदूच्या आंबेडकरांचा नाहीचंय...
प्रश्न आहे दलित, महार या व्यक्तीने कायदामंत्री होऊन संविधानाच्या ड्राफ्टींग कमिटीचे नेतृत्व केल्याचा?
आंबेडकर हे संविधान लिहण्यापुर्वी, आणि लिहीत असताना हिंदू होते... मग ते हिंदूचे संविधान आहे....
किती महान विचार आहे... मग हिंदू आंबेडकर आणि संविधान दोन्ही स्विकारत नाहीत काय?
संविधान सर्व तमाम भारतीयांचं आहे आणि असेल तर भारतीय संविधानाचा अवमान उघडया डोळ्यांनी का पाहतात?
तर केवळ ते दलिताच्या व्यक्तीने लिहीले म्हणूनच ना? बस फक्त या दलिताच्या आधी संविधान निर्मितीचा जनक पुराणातून, अथवा तथाकथित तत्कालिन इतिहासून जातीने हिंदू असणारा निर्माण करून संविधानाचा जनक म्हणून मान्यता दिली. शुध्दीकरण केले की झाले हिंदूराष्ट्र असे आहे काय?
दलितांचा एवढा व्देष की फेसबुक, वॉटसप, वरही दलित विरहीत संघटना, समुदाय, आणि उद्याचे राष्ट्र असा कांही अजेंडा आहे काय?
भाऊ मी दलित आहे माझा गुन्हा काय?हे स्पष्ट सांगाल काय?
मी पोस्ट केल्यावर तत्काळ ग्रुपमधून काढून टाकताल... पण हिंदू म्हणून सन्मानाने जगण्यासाठी काय करावे अशी आपल्यासारख्या तमाम युवा बंधू भगिणींची अपेक्षा आहे?
कांही चुकलं तर लहान भाऊ समजून माफ करा.. बाकीचे चिथावणी देत असतील... मी अशांचे कधीच समर्थन करणार नाही. परंतू एक माणूस म्हणून... माणसासाठी आपले मत काय?
आपण खुप विचारशील, तर्कशील, चिंतनशील दिसता म्हणून आपल्याला विनंती करण्याचा अपराध करतो आहे.
उत्तराच्या प्रतिक्षेत.
जयहिंद.. जय भारत..
Comments
Post a Comment