हाडामासाचा माणूस... पाटीला प्वॉट चिटाकलं तरी निवद उचलायची टाप नव्हती.... भोगल्यालं समदं दुक आजा सांगत व्हता...
पुस्तकात परतेकाचं दुक लिहीलं जातंच आसं नाही... पर थोडं बहुत समदयांच्या नशिबी हाच भोग थोडया बहुत फरकानं आला बस...
ज्यानं मांडला त्याचंच इतिहासात नाव...
जो या वेवस्थेशी भांडला त्याचंबी इतिहासात नाव...

पर इथल्या परतेक मनुष्याचा वैभवशाली इतिहास आहे... याच्याशी तडजोड करून आज तुमचं जरी भलं झालं... तरं तुमच्या दुकांचं भांडवलं ... दुखं देणारा जुलूम करणारा बी करील... तवा .... इतिहास इसरणं म्हणजी आपली पुढची पिढी भिकाला लावणं होय....
इतिहास लिहीणाऱ्यानी
तुमचं नाव चोरलं...
तुमचा गाव चोरला...
तुमचा देव चोरला...
आरं एवढंच नायतर तुमचा स्वभाव बी चोरला...
कधीकाळची शुध्द जात आज शुद्र केली ती भंगार इतिहासकारांनीच...

जवाची तवा बोलतानी यांची तोंडं शिवल्याली असत्याती काय?
खरं खोटं कराय त्यो माणूस जिता नाय... त्याची कड घेणारीही जिती नाही...

फायद्यासाठी कायदाबी बदलला...
आम्ही फकस्त म्हणतू कायदा लिहीला बापांनी आमुच्या आम्हाला शिकवता काय?
आणि त्यांनी ज्या बापाच्या नाव घेतल्यानं आम्हीच निवडून दिलं त्यांनी आमच्या जाब इच्चारणं जास्तच मनावर घेतलं...

आम्हाला शिकवता काय? 
हे त्यांना जीवारी लागलं... आणि त्यांनी शिक्षणाचा हक्कच हिसकावून घेतला...

देशात शेतकऱ्यांनी फाश्या घेतल्यावर कुत्रंबी इच्चारत न्हाय...  वाळल्या बाभळीला फाशी घेणाऱ्या अभाग्या,
कोटी रुपयाच्या बंगल्यात तो रजपुताचा सुशांत लटकला... अक्क देस चिंतेत हाय...
तवा... तुझ्याकडं लक्ष द्यायला कुणालाय फुरसत... उलट तुच मरणाचा इच्चार पुढ ढकल... पर मरच... हयोच भोग तुझ्या नशिबात हाय...

तृतियपंथ काय खुश झाले... आखाडामध्ये त्यांचा मान त्यांना परत मिळाला म्हणून... उच्च जातीचे दाखले,श्रेष्ठत्वाचे दाखले सगळ्या पोथी पुराणांनी दिले... त्याच्या भ्रमात चौकाचौकात टाळ्या वाजविणारे... तुम्ही...

छक्के.. हिजडे... म्हणत... हीनदिन अस्पृश्यागत तुम्हीही शोषित, पिडित, वंचितच ना...

राजा महाराजांच्या वरातीत नाचणारे... त्यांच्या पोराबाळांला दुवा देणारे तुम्ही...

तुमच्यातली एक लक्ष्मी जागी झाली... हक्कासाठी, न्यायासाठी आवाज उठवू लागली....
तिला स्वतः तृतीयपंथी असल्याचा सार्थ अभिमान आहे... टाळ्या वाजवून भोग भोगणाऱ्या जातीस स्वाभिमानानं जगायला शिकविऱ्या लक्ष्मीचा थक्क करणारा संघर्ष पाहणारे आपसुकच टाळ्या वाजवतात....

मग खरा तृतीयपंथी कोण?
चुल आणि मुल सांभाळणारी... हायस्कुल सांभाळाय शिकली... ऐटीत आय टी मध्ये जायला.. लागली... जमिनीवर सोडा अंतराळात गेली...

कशामुळं... कुणामुळं
संविधानामुळं... आन्... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळंच ना?

गरीबालाच गरीबीची जाण असती...
राजाची पोरं कायदा करत्याल...

Comments