बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती?

अवधूत मोहिते साठी प्रोफाइल फोटो

भाकडकथा आणि चमत्कार तर प्रत्येक धर्मातच भरपूर असतात. त्याप्रमाणे ते बौद्ध धर्मातही आहेत.

  1. बौद्ध साहित्यात अनेक देवता, असुर, गंधर्व, यक्ष अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो.
  2. असुरलोक, भूतलोक, ब्रह्मलोक अशा जागांचा उल्लेख आहे. एकूण ३१ प्रकारचे स्वर्ग आणि नरक आहेत असे मानले जाते.
  3. भगवान बुद्ध वृक्षाखाली समाधी लावून बसले असताना 'मारा' नावाच्या राक्षसाने त्यांना जादूई प्रलोभने दाखवली अशी कथा तिबेट आणि चीनमध्ये प्रसिद्ध आहे.
  4. कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत बौद्ध धर्माने मान्य केला आहे, तो सिद्धांत बऱ्याच जणांना अंधश्रद्धा वाटतो.
  5. दलाई लामा म्हणजे अवलोकितेश्र्वर या देवतेचा अवतार आहेत असे बौद्ध धर्मात मानले जाते.
  6. बौद्ध धर्मात बोधिसत्व नावाचा जो प्रकार आहे तो म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातील अवतारवादाची नक्कल केली आहे. बोधिसत्व म्हणजे असा आत्मा जो लोकांच्या कल्याणासाठी अनेकवेळा जन्म घेतो.
  7. बौद्ध धर्मातील सर्वात वाईट अंधश्रद्धा म्हणजे मूर्तिपूजा. बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल, परंतु भारताच्या इतिहासात मूर्तिपूजेची सुरुवात सर्वप्रथम बौद्धांनीच केली होती. बौद्ध धर्माच्या आधी वैदिक धर्मात मूर्तिची पूजा कोणीही करत नसे. अरबी आणि फारसी भाषेमध्ये मूर्तीसाठी "बुत" हा शब्द आहे. हा शब्द आला कोठून? जेव्हा अरब आणि फारसी मुस्लिम भारतात पहिल्यांदा आले तेंव्हा त्यांना बौद्ध भिक्खू बुद्धांच्या मूर्तीची पूजा करताना दिसले. तेव्हा "बुद्ध" या शब्दावरुन त्यांनी "बुत" म्हणणे चालू केले.

अशा आणखी बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. प्रत्त्येक देशात वेगवेगळ्या अंधश्रद्धा सापडतील.

बुद्धीला न पटणारे सिद्धांत देखील बौद्ध धर्मात भरपूर आहेत.

  1. बुद्धांचा सर्वात पहिला उपदेशच मुळात बुद्धीला पटत नाही. बुद्धांनी आर्यसत्यांमध्ये सांगितले आहे की तृष्णा म्हणजे इच्छा ही सर्व दु:खाचे मूळ आहे व दु;खापासून निर्वाण मिळविण्यासाठी सर्व इच्छांचा नाश करावा लागेल. परंतु हे प्रत्यक्षात अशक्य आहे. जोपर्यंत मनुष्य जीवंत आहे तोपर्यंत सर्व इच्छांचा नाश कधीच होऊ शकत नाही. निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा हीदेखील एक इच्छाच आहे. तर मग निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा देखील सोडून द्यायची का? जर निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा सोडली तर निर्वाण कसे मिळणार?
  2. बुद्धांच्या काही शतकानंतर प्रसिद्ध बौद्ध तत्वज्ञानी नागार्जुनने शून्यवाद हा सिद्धांत तयार केला. शून्यवाद म्हणजे जगात सर्व वस्तू शून्य आहेत. कोणत्याच वस्तूंना स्वत:चे अस्तित्व नाही. सर्वकाही शून्य असल्यामुळे काहीच अस्तित्वात नाही असे हा सिद्धांत सांगतो. जर काहीच अस्तित्वात नाही तर मग डोळ्यांना दिसणारे जग आले कोठून ? जिथे काहीच नाही त्यातून कशाचीही उत्पत्ती कशी होऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकत नाहीत.
  3. अनात्मा हा बौद्ध धर्मात एक खूप महत्वाचा उपदेश आहे ‌. बुद्धांनी स्वत: हा सिद्धांत शिकवला होता असे मानले जाते. अनात्मा म्हणजे कोणत्याही प्राण्याला आत्मा नाही. जर आत्मा अस्तित्वात नसेल तर पुनर्जन्म होणे कसे शक्य आहे? एका आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यात काहीतरी पुढे जाणे याला पुनर्जन्म म्हणतात. परंतु जर आत्माच नसेल तर पुनर्जन्म कसा काय बुद्धांनी मान्य केला?
  4. बौद्ध धर्मात असे मानले जाते की सर्व वस्तू आणि प्राणी हे भौतिक पदार्थांच्या मिश्रणातून तयार झाले आहेत आणि त्यामुळे अनित्य आहेत. परंतु चेतना (consciousness) ही भौतिक पदार्थांपासून तयार होते हे अजूनही कोणी सिद्ध करु शकले नाही.

बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती?

बौद्ध धम्मग्रंथ पाली त्रिपिटक येथे त्याची लिंक देत आहे सोबत त्याच्या इंग्रजी भाषांतराची सुद्धा लिंक देत आहे, कृपया त्यातील चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती? हे सांगावे म्हणजे तुमच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का? हे समजल्यावर यावर सविस्तर उत्तर लिहिता येईल!

पाली त्रिपिटक लिंक : CSCD Tipitaka (Devanagari)

इंग्रजी त्रिपिटक लिंक: SuttaCentral

[जातक कथा हा बौद्ध संस्कृतीचा फार महत्वाचा घटक आहे. 'जन्मलेला' या अर्थाने 'जात' या शब्दापासून 'जातक' हे शब्दरूप बनले आहे. गौतम बुद्धांनी वर्तमान जन्मापूर्वी बोधिसत्व म्हणून जे विविध जन्म घेतल्याचे जे मानले जाते, त्याची वर्णन या कथांमधून आहेत. जातककथा हा प्रत्यक्ष इतिहास नव्हे. तथागतांच्या पूर्वी समाजात होऊन गेलेल्या विविध महत्वपूर्ण व्यक्तींचा वारसा तथागतांना मिळाला होता, असे मात्र त्या सूचित करतात. त्यातील काही कथा बोधकथा म्हणून उपयोगी पडतात. काही एक सलग, उमदा संस्कृतिप्रवाह दर्शवितात, तर काही कथा अनिष्ट आणि अस्वीकार्यही आहेत. ]

Comments